वाचन गट
वाचन गट हे विद्यार्थ्यांची वाचनासंबंधी प्रगती सहजपणे तपासण्यात शिक्षकांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेले नवीन वैशिष्ट्य आहे.शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत व्हर्च्युअल वाचन गट तयार करू शकतात आणि विद्यार्थ्यांनी वाचनाला दिलेला वेळ, वाचनाची गती, सर्वात लोकप्रिय कथा यांसारख्या वाचनाशी संबंधित अॅक्टिव्हिटी व इतर बरेच काही पाहू शकतात.या वैशिष्ट्याच्या मदतीने त्यांना इनॅक्टिव्ह असलेले किंवा धडपडणारे विद्यार्थी ओळखता येऊ शकतात आणि त्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ते असाइनमेंट शेअर करू शकतात. हे वैशिष्ट्य वापरून शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगले वाचक बनण्यात मदत करण्यासाठी परिणामकारक हस्तक्षेप करू शकतात.
शिक्षकांसाठी माहितीपुस्तिका
तुमच्या विद्यार्थ्यांना Read Along वापरून वर्गाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे वाचन शिकण्यास व सराव करण्यास मदत करा. हे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यात आणि वाचनाची आवड निर्माण करण्यात मदत करेल. (केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध)
आमच्यासाठी तुमचा फीडबॅक मौल्यवान आहे
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना Read Along ची ओळख करून दिली असल्यास आणि तुम्हाला तुमचा अनुभव किंवा सूचना शेअर करायच्या असल्यास, आम्हाला ते तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आमच्याशी readalong@google.com येथे संपर्क साधा