द फॉउण्डेशनल लिटरेसी आणि नुमेरसी मिशन
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टॅंडिंग ॲंड न्युमरसी (NIPUN भारत) हा उपक्रम सुरू केला. या कार्यक्रमाचे लक्ष्य आहे २०२६-२७ पर्यंत, प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरीच्या अखेरीपर्यंत वाचन, लेखन आणि अंकगणित (FLN ) शिकण्याची क्षमता दिली जाईल.
मिशनशी संबंधित ध्येये
समजून घ्या आणि वाचा.
लिहिणे
मूलभूत गणिते सोडवा.
मूलभूत जीवन कौशल्ये शिकणे.
Read Along चे फायदे
Read Along ची अशी वैशिष्ट्ये जी राज्यांना त्यांची FLN मिशनशी संबंधित ध्येये गाठण्यात मदत करू शकतात
लहान विद्यार्थी मोठ्याने वाचतात, तेव्हा अॅपमधील असिस्टंट, दिया ते ऐकते. ते अडखळतात, तेव्हा त्यांना मदत करते आणि ते उत्तमरीत्या वाचतात, तेव्हा त्यांचे कौतुक करते.
विद्यार्थी वाचत असताना तारे आणि बॅज मिळवतात, त्यामुळे त्यांचा वाचनाचा अनुभव मजेशीर होतो.
अॅप ऑफलाइनदेखील काम करते आणि १GB RAM असलेल्या सामान्य स्मार्टफोनवर वापरले जाऊ शकते.
इंग्रजी आणि त्यासोबतच हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, बंगाली, गुजराती व उर्दू अशा विविध सात भारतीय भाषांत उपलब्ध आहे .
सहज विस्तार करण्या योग्य असून, राज्य, गट आणि जिल्हा स्तरावर प्रादेशिक सरकारी संरचनेमध्ये रीड अलाँग सहजपणे लागू केले जाऊ शकते व देखरेख केले जाऊ शकते.
NIPUN भारत आणि Read Along
गेल्या काही वर्षांत, शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली, तरीही विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता आणि अंकगणित सोडवण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. Read Along हे विद्यार्थ्यांमधील वाचन आणि आकलन कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे, यामुळे त्यांना त्यांचे साक्षरतेचे मूलभूत ध्येय गाठण्यात मदत होते.
PDF डाउनलोड करा*ही PDF फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
उत्तर प्रदेश ची case study
COVID मुळे शाळा बंद असतानादेखील Read Along ने उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना शिक्षण पुढे सुरू ठेवण्यात कशी मदत केली ते पहा.
PDF डाउनलोड करा*ही PDF फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.
Read Along कुठे कुठे वापरले जाते
Read Along हे आधीपासून तीन राज्य सरकारांच्या कार्यक्रमांचा भाग आहे
उत्तर प्रदेश
मिशन प्रेरणा
विद्यार्थी हे २०२२ पर्यंत मूलभूत साक्षरता आणि अंक ज्ञान संपादन करतील हे सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख FLN कार्यक्रम सुरू केला आहे
तेलंगणा
COVID मुळे शाळा बंद झाल्याने प्राथमिक इयत्तांमधील साक्षरता आणि अंक ज्ञान यासंबंधित शिक्षणात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे
गुजरात
साथे वांचिये
विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवता यावे, यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीची राज्य पाठ्यपुस्तके Read Along वर उपलब्ध करून दिली आहेत.